औरंगाबाद : डिझाईन चुकल्यामुळे लाडगाव चौफुलीवरील सदगूरू नारायणगिरीजी महाराज कमानीचे काम काही दिवसांपासून थांबविण्यात आले आहे. वैजापूर श्रीरामपूर महामार्गावर शिवसेना व प्रहार संघटनेने अनेक वर्षांपासून प्रतीष्ठेच्या केलेल्या या कमानी पुर्णत्वास जात नसल्याने नागरीक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
फकिराबादवाडीचे सैन्यातील जवान किरण थोरात यांना शत्रूशी लढताना तीन वर्षापुर्वी विरमरण आले होते. त्यामुळे या मार्गावर लाडगाव चौफुलीवर विरजवान किरण थोरात यांच्या नावाने कमान उभारण्याचा निर्णय प्रहार संघटनेने घेतला.तसेच या कामाचा शुभारंभ ही केला.
शिवसेनेनेही लगेच याच चौफुलीवर सदगूरू नारायणगीरी महाराज यांच्या नावाने कमान उभारण्याचा निर्णय घेतला.
या मार्गावर सराला बेट हे तिर्थक्षेत्र असून औरंगाबाद सह नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात. त्यामुळे या दोन्ही कमानी कडे नागरीकांचे लक्ष लागले. मध्यंतरीच्या काळात शिवसेना, प्रहार संघटनेमध्ये कमान वाद उफाळून आला.प्रहार संघटनेने कमानीचे काम सुरू करताच, शिवसेनेनेही लगेच काही अंतरावर काम सुरू करून दोन तीन महीन्यातच लोखंडी कमान उभारली.
घाई गडबडीत उभारलेली ही कमान सहा महीन्यातच वादळात पडली. त्यामुळे प्रहार ने सोशल मिडीयातून शिवसेनेची खिल्ली उडविली. हे शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला.या मार्गावर कमान उभारण्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा करून नगरविकास निधीतून २५ लाख रूपये निधी मंजूर केला. साधारणपणे एक महिन्यापुर्वी या कमालीच्या कामाचे रामगिरी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ठेकेदाराने या कामास सुरुवात केली.मात्र अचानक हे काम बंद करण्यात आले असून या जागेवरील सर्व साहित्य ठेकेदार घेऊन गेला.
त्यामुळे तीन वर्षांपासून गाजत असलेला कमान वाद हा सध्या जैसे थे स्थितीत आहे. प्रहार संघटनेला ही तीन वर्षांपासून कमानिचे काम पूर्ण करता आले नाही. नागरीक मात्र या दोन्ही कमानी कडे उत्सुकतेने पाहत आहेत. डिझाईन चुकल्यामुळे या कमानीचे काम थांबविण्यात आले आहे. एक वर्षात हे काम पूर्ण करावयाचे आहे. सध्या काम सुरू होऊन फक्त एक महीना झाला असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

