Share

‘कोरोनामुळे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे विमा योजनेचा लाभ द्या’, शिवसंग्रामची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा : ग्रामीण भागातील कुटुंबप्रमुख आणि प्रत्यक्ष शेतीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्यांचा स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत समावेश करून कुटुंबियांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एका वर्षापासून संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांची लॉकडाऊन आणि कोरोनामुळे प्रचंड दुर्दशा झाली आहे. यावर्षी शेतमालाला चांगला भाव असल्यामुळे दिलासा मिळाला. परंतु कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. बहुतांश परिवारामध्ये रुग्ण आढळल्याने शासन व प्रशासन पूर्णपणे हतबल झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयीअभावी शेतकरी कुटुंबातील प्रमुख लोकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही हेळसांडीला सामोरे जावे लागते.

बहुतांश शेतकरी परिस्थितीअभावी विमा घेत नाही. कुठलीच आर्थिक सुरक्षा कुटुंबाकडे राहत नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी कुटुंबातील कोरोनाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना ‘स्व.गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजने’चा लाभ देण्याची तरतूद करावी. यामुळे राज्यभरातील शेतकरी कुटुंबांना आधार मिळेल, असे देऊळगाव राजा येथील शिवसंग्राम संघटनेने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!