Share

पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करा-काँग्रेस

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या वाढत्या संकटात गगनाला भिडलेल्या इंधन दरावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना काळात वेळोवेळी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करत सामान्य जनतेला दिलासा देण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोलचे दर २७ पैसे, तर डिझेलचे भाव ३० पैशांनी वाढविल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सरकारने पेट्रोल-डिझेलचा समावेश वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीमध्ये करावा, तसेच जोपर्यंत असे होत नाही तोपर्यंत सरकारने उत्पादन शुल्कात करण्यात आलेली वाढ मागे घेतली पाहिजे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. १३० कोटी भारतीय आजघडीला कोरोना महामारीशी दोन हात करत आहेत; परंतु भारतीय जनलूट पार्टीची (भाजपा)सर्रासपणे लूट सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

मोदी सरकारने गेल्या ८ दिवसांमध्ये पेट्रोलचे भाव १ रुपया ४० पैसे आणि डिझेलचे दर १ रुपया ६३ पैशांनी वाढवले. खरे तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती या काँग्रेस सरकारच्या काळातील तुलनेत एक चतुर्थांशने कमी आहेत; परंतु मोदी सरकार वारंवार इंधन दरवाढ करत सामान्य जनतेचे तेल काढत असल्याचे सुरजेवाला म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!