Share

‘माझ्या देशातील लोक मरत असताना, मी आता लग्न करणार नाही’; ‘या’ अभिनेत्रीने घेतला निर्णय

Published On: 

मुंबई :सध्या देशात कोरोना काळात देखील मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी विवाह करत आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरवात केली. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतील वैशाली टक्करचा देखील यावर्षी विवाह होणार होता. मात्र देशात सुरु असणाऱ्या कोरोनाच्या संकटाचा विचार करून तिने तिचे लग्न पुढच्या वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत अभिनेत्री वैशाली टक्कर म्हणाली की, ‘सध्याचे परिस्थिती पाहता मी माझे लग्न पुढे ढकलले आहे. मी अशा वातावरणात लग्न कसे करु शकते, जेव्हा लोक दररोज मरत आहेत, ते अस्वस्थ आहेत. यावर्षी मला नवं आयुष्य सुरू करावंस वाटत नाही आहे. यावर्षी माझे लग्न होणार नाही. सध्या भारत सर्वाधिक प्रभावित आहे आणि मी उत्सव, लग्न किंवा देशाबाहेर जाण्याच्या मूडमध्ये नाही. माझ्या देशात, जेव्हा आजूबाजूचे लोक पीडित आहेत आणि मरत आहेत, तेव्हा हे पाऊल उचलणे मला योग्य वाटत नाही.’ वैशाली टक्करने घेतलेल्या या निर्णयाचे अनेकजण कौतुक करत आहेत.

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रोज लाखो नवे रूग्ण सापडत आहेत. वैदयकीय  सुविधांच्या अभावी रूग्णांना जीव गमवावा लागतोय. या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी पुढे येत मदतीचा हात दिला आहे. आजच्या या परिस्थितीमध्ये एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. अशात मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तिंकडून मिळणारी ही मदत लाखमोलाची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!