Share

मैदाने आणि जॉगिंग ट्रॅक खुली करा; आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. मकरंद जोशी यांची मागणी

Published On: 

औरंगाबाद : कोरोनानंतर प्रतिकारशक्तीला असलेले महत्त्व विशेष आधोरेखित झाले आहे. प्रतिकारशक्ती विकसित करावयाची असल्यास येत्या काळात खेळ आणि व्यायामाला प्राधान्य द्यायला हवे, असे मत डॉ. मकरंद जोशी यांनी क्रीडा भारतीतर्फे आयोजित कार्यशाळेत व्यक्त केले. या कार्यशाळेत क्रीडा भारतीचे महामंत्री राज चौधरी, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अनिल करवंदे, प्राचार्य अशोक काळे आणि डॉ. संजय करवडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

डॉ. जोशी म्हणाले की, मैदानी खेळ, योगासन, प्राणायम, सूर्यनमस्कार आणि धावणे आवश्यक आहे. आजघडीला शरीर व मनाला प्रतिकारशक्तीची आवश्यकता आहे. तंदरुस्त शरीर, तीक्ष्ण बुद्धी मिळविण्यासाठी खेळ व व्यायाम आवश्यक आहे. मोकळ्या हवेत योग्य अंतर ठेऊन केलेल्या हालचालींमुळे कोरोना पसरण्याचा धोका नाही, हे सिद्ध झाले आहे. सरकारी नियमात अडकलेल्या परंतू आताच्या परिस्थितीत आवश्यक असलेली मैदाने आणि जॉगिंग ट्रॅक खुली करावी.

डॉ. अनिल करवंदे म्हणाले की, कोरोना होऊ नये अथवा त्यातून बाहेर पडण्यासाठी व्यायाम प्राणायम, सूर्यनमस्कार आणि सायकलिंग आवश्यक आहे. श्री. काळे म्हणाले की, शरीर व मन तंदरुस्त राहण्यासाठी अंर्त व बाह्य स्वच्छता आवश्यक आहे. समारोपीय भाषणात राज चौधरी म्हणाले की, कोरोनामुळे लोक अधिक चिंतातूर झालेले आहे. चिंता दूर करण्यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक आहे. खेळाद्वारे स्नायूंची हालचाल होते व ते बळकट होतात. चेंडू, रिंग, फ्लाईंग डिशसारख्या खेळांनी आरोग्य सुधारते व अंतर राखल्याने कोरोनाची भिती नाही. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रिडा भारतीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मिलिंद डांगे यांनी मानले. यासाठी श्रीकांत धर्माधिकारी, विजय पुरंदरे यांनी परिश्रम घेतले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!