Share

अभिनेत्री शुभांगी गोखले लेकीचे पत्र वाचून झाल्या भावुक; इन्स्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असून खबरदारी म्हणून महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे सगळच बंद करण्यात आले त्यातच शूटिंगलाही बंदी घालण्यात आली. त्यामुळे बऱ्याच मालिकांचे शूटिंग इतर राज्यात सुरू कण्यात आले. झी मराठी वाहिनीवरील मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचे शूटिंग सिल्व्हासा येथे सुरू आहे. मात्र या सेटवर मदर्स डेच्या दिवशी एक वेगळंच चित्र पाहायला मिळाले. सेटवर केक आणि त्यासोबत एक भावनिक पत्र आले. हे पत्र वाचून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले.

अभिनेत्री शुभांगी गोखले यांची लेक आणि अभिनेत्री सखी गोखले हिने मदर्स डे निमित्त केकसोबत एक पत्र सेटवर पाठवले होते. या पत्रात सखीने म्हटले की, अम्मा शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर, शुभांगी भुजबळ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील सर्व ऑन आणि ऑफ स्क्रीन मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी आभार. आमचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून घरापासून दूर राहून काम करण्यासाठी धन्यवाद.

https://www.instagram.com/p/COqgtO0ptwg/?utm_source=ig_web_copy_link

हे पत्र वाचल्यानंतर शुभांगी गोखले भावनिक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. शुभांगी गोखलेंची इन्स्टाग्रामवर एक भलीमोठी  पोस्ट शेअर करत सांगितले की सखीनी प्रॉडक्शन टीमची मदत घेऊन या शुभेच्छा पाठवल्या. आजच्या मदर्स डे च्या निमीत्तानी पण आज सगळ्या फेसबुक, इनस्टावरच्या पोस्ट्स बघून बरं वाटत होतं
मुलामुलींनी विवीध शैलीत प्रेम व्यक्त करत आयांचे खूपच गोड फोटो टाकलेले बघत दिवस गेला.. त्यातल्या सगळ्यांनाच काही मी ओळखते असं नाही..आजचं शूट संपल्यावर संध्याकाळी डायनींग हॉलमध्ये हळूहळू सगळे जमत होतो कुणी शॉवर घेऊन, कुणी शूटींगच्याच वेषात.. एक केक आला होता सगळ्या आयांसाठी..!
सखीनी प्रॉडक्शन टीमची मदत घेऊन या शुभेच्छा पाठवल्या. तीने एक गोड पत्र ही पाठंवलं.. युनिटमधल्या सगळ्या आयांसाठी…
त्यानंतर बायो बबलचा एक टीअर बबल झाला! आयांना मुलांच्या आठवणीनी आणि मुलांना आईच्या आठवणीनी एवढं रडू कोसळलं..सखी,या वैश्विक संकट काळात तू पाठवलेलं प्रेम.. सगळं भरुन पावलं, ‘ अशी भावनिक पोस्ट शुभांगी गोखले यांनी शेअर केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!