🕒 1 min read
लखनऊ : कोरोना सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कार्यपद्धतीत काही त्रुटी असतील तर विरोधकांनी टीका करण्याऐवजी सल्ला दिला पाहिजे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. लखनऊचे खासदार असलेल्या राजनाथ यांनी आपल्या मतदारसंघातील हज हाऊसमध्ये एचएएलने तयार केलेल्या २२५ खाटांच्या कोविड केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना राजनाथ यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.
उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाविरोधी लढ्यात उल्लेखनीय काम केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील योगी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. मला मान्य आहे की, काही त्रुटी असतील. शेवटी जो काम करतो त्याच्याकडून चुका होतात. मात्र ही राजकारणाची वेळ नाही. त्रुटींवर टीका करण्याऐवजी त्या दुरुस्त करण्यासाठी सल्ला दिला पाहिजे, असे राजनाथ म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटाला आव्हान म्हणून स्वीकारले आहे आणि त्यावर मात करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन इतर देशांसोबतचे संबंध अधिक दृढ केले. मोदी सरकारच्या या मुत्सद्देगिरीचे फलित म्हणूनच आज आपल्याला जागतिक समुदाय मदत करत आहे, अशा शब्दांत संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. राजनाथ सिंहांनी यापूर्वी लखनौमध्ये डीआरडीओच्या मदतीने ४५० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- राज्याच्या अधिकारातील सवलती मराठा समाजाला द्या, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोपमुक्त करण्याची विनंती करणे आरोपीचा अधिकार-सर्वोच्च न्यायालय
- अडचणीत वाढ; परमबीर सिंहांविरोधात तक्रारीच्या चौकशीचे गृहविभागाचे आदेश
- आता कुठे गेले अंध भक्त? मोदींनी उद्धव ठाकरेंचे कौतुक करताच स्वामींचा टोला
- ‘माझी विकेट फक्त….’ सीएसकेच्या ऋुतुराजची मराठमोळी पोस्ट; सायली संजीववर साधला निशाणा


