🕒 1 min read
नवी दिल्ली : कनिष्ठ न्यायालयांना गुण-दोषांच्या आधारावर खटल्यांचा विचार करण्याचे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोप निश्चितीपासून मुक्त करण्याची विनंती करणे हा कायद्याने आरोपीचा बहुमूल्य अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
उत्तरप्रदेशातील संजयकुमार राय नामक व्यक्तीच्या याचिकेवर सरन्यायाधीश एन. व्ही रमणा यांचे खंडपीठ सुनावणी करत होते. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी संजयकुमार विरोधात भादंवि ५०४ व ५०५ अन्वये आरोप निश्चित केले होते. कनिष्ठ न्यायालयाचा हा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने देखील कायम ठेवला होता. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयांनी याचिकांवर विचार करताना एखाद्या टपाल कार्यालयाप्रमाणे काम करणे अपेक्षित नसल्याचे निरीक्षण नोंदवले.
संशयितांविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसा आधार आहे की नाही, हे ठरवण्यासाठी न्यायालयांनी साक्षीपुराव्यांचा तपास करण्याची गरज आहे. न्यायालयांना व्यापक शक्यता, सादर दस्ताऐवज आणि साक्षीपुराव्यांचा एकूण परिणाम आणि खटल्यातील त्रृटी यांचा विचार करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे न्यायालयाने गरज पडल्यास आपल्या सदसद विवेकबुद्धीने योग्य खटल्यांमध्ये पुढील तपासाचा आदेश देऊ शकतात, असे खंडपीठाने नमूद केले.
गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोप निश्चितीपासून मुक्त करण्याची विनंती करणे हा कायद्याने आरोपीचा बहुमुल्य अधिकार आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याची बाजूच ऐकून न घेता न्यायिक चूक केली आहे, असे खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले. कनिष्ठ न्यायालयातून आलेल्या प्रकरणांमध्ये सर्व गुण-दोष विचारात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडे पाठवून दिले आणि कायद्याने त्यावर विचार करण्यास सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- सोनू सूदने पंतप्रधान व्हावे, यावर उत्तर देत त्याने पुन्हा एकदा जिंकली लोकांची मनं…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

