मुंबई : आयपीएल स्पर्धेदरम्यान अनेक युवा खेळाडूंना संधी मिळत असते. २०२१ मध्ये सीएसकेचा सलामीवीर ऋुतुराज गायकवाडनेही आयपीएल स्पर्धेत आपली छाप सोडली. मात्र या स्पर्धेरदम्यान त्याचे नाव आणखी एका कारणामुळे चर्चेत आले. ते म्हणजे मराठी अभिनेत्री सायली संजीवमुळे.
स्पर्धेदरम्यान अभिनेत्री सायली संजिवच्या फोटोवर कमेंट केल्यानंतर तिने दिलेल्या प्रतिक्रियामुळे ऋुतुराजचे नाव तिच्यासोबत जोडले जाउ लागले. मात्र या अफवांना ऋुतुराजने त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. ऋुतुराजने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी पोस्ट केली. या पोस्टमध्ये एका सामन्यात तो त्रिफळाचीत झाल्याचा फोटो पोस्ट करत त्यावर मराठीत कॅप्शन दिले होते. या कॅप्शनमध्ये तो म्हणतो की, ‘माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो. आणि हो क्लिबोल्ड पण’ असे लिहीले आहे. या कॅप्शनमुळे त्याने सायलीसोबत सुरु असलेल्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

या कॅप्शनमध्ये ऋुतुराज लिहीतो की, ‘कोणाचं काय तर कोणाच काय…ज्याला समजायचं त्यानी समजा, कोणातरी खरं म्हणलय मीठ, मसाला, मिर्ची टाकली की चव येते.’. या पोस्टवर आता अभिनेत्री सायली संजीव काय उत्तर देते हे पाहणे उत्सुकतेच राहील. यापुर्वी दोघांनी अनेकदा एकमेंकांच्या पोस्टवर कमेंट केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोलापूरच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक ‘नाहरकत प्रमाणपत्रे’ द्यावीत’
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- ‘शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे’
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर


