मुंबई : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. यामुळे मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे. केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मराठा समाजाला केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण देण्याची मागणी नरेंद्र मोदींकडे या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरीत 13 टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्राने योग्य पावलं उचलावीत, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आलीय.
दरम्यान, आता याच पत्रप्रपंचावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी टीका करत राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. मराठा आरक्षण बाबत मुख्यमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री ना पत्र लिहिल्याचे समजले. पुन्हा एकदा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम आहे असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, गायकवाड आयोग स्वीकारून सरसकट ओबीसी समावेश जे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे त्या विकल्पाकडे ठरवून दुर्लक्ष करून केंद्राकडे बोटं दाखवून हाथ झटकण्याचा घृणास्पद प्रकार मुख्यमंत्री करत आहेत. ज्या व्यक्तीने कधीही शब्द बदलला नाही अशा बाळासाहेबांचे ते वारस आहेत, परंतु सध्या ‘बारामती’ची हवा त्यांना जरा जास्तच मानवलेली दिसतेय.. गोड बोलणे आणि पाठीत सुरी घोपासने.
पुढे ते म्हणाले, अजितदादा पवार 3 महिन्यापूर्वी मला म्हणाले होते, तुमचं सगळं पटतंय पण आमचं ठरलंय मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्यायच नाही… पुन्हा एकदा मोर्चे निघाले आणि ह्या प्रस्थापित मराठा नेत्यांचे घर जरी तरुणांनी जाळली तर नवल वाटू नये…असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुण्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र असले, तरी आपण आता गाफील राहणार नाही’
- शांत स्वभावाचा हनुमा विहारी भडकला, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर
- ‘राज्यपालांना केवळ एक निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा जबाबदारी टाळली’
- ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल; ३७ तासांत कापले १ हजार ७२५ किमी अंतर
- ‘गंगेच्या किनारी विखुरलेल्या अवस्थेत पडलेले मृतदेह पाहून मनाला खूप वेदना झाल्या…!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

