🕒 1 min read
औरंगाबाद : गुन्हा दाखल झाल्याच्या दोन आठवड्यानंतर संजय शिरसाट यांनी उद्घाटन प्रकरणावर मौन सोडत मी लोकांना पाणी पाजण्यासाठी तो समारंभ घेतला. असे म्हणत स्वतःची बाजू मांडली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.
मागील महिन्यात आमदार शिरसाट यांनी वाळुज येथे जलवाहिनीचे भूमिपूजन केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासुन ते या प्रकरणावर मौन बाळगून होते. मात्र, त्यांनी सोमवारी याप्रकरणी लोकांना पाणी पाजण्यासाठी गुन्हा अंगावर घेतल्याचा खुलासा केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शिरसाठ शहरात नसल्याचे सांगितले होते. मात्र, मागील सोमवारी तसेच आज त्यांनी आढावा बैठकीला हजेरी लावली. मात्र, पोलिसांना ते अद्यापही नोटीस देण्यासाठी सापडले नाही. त्यांनी केलेले नियमांचे उल्लंघन कितपत योग्य आहे हे येणारा काळच सांगेल अशी चर्चा शहरात सुरू होती.
महत्त्वाच्या बातम्या
- घाटीत कोरोनाग्रस्त बालकांना खेळण्यासाठी खोली मात्र, पालकांनो ही वेळच यायला नको!
- …तर ही वेळच आली नसती, विदेशातून मिळणाऱ्या मदतीवर राहुल यांची टीका
- आता एकाच अर्जाद्वारे मिळणार शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ
- मायदेशी परतल्यानंतर बोल्टची भावुक पोस्ट, भारतात पुन्हा परतण्याची केली इच्छा व्यक्त
- नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, नवाब मलिकांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

