Share

‘उद्धवजी, आपण फक्त मुंबईचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात याची ग्वाही मिळेल अशी अपेक्षा करतो’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवार) रात्री साडेआठ वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत. लसीकरण, लॉकडाऊन, किंवा सरकारची विविध धोरणं असोत, तसेच कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीशी लढण्याची सरकारची तयारी यासंदर्भात मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जनतेशी संवाद साधून राज्यामध्ये असलेल्या कोरोना परिस्थिती बाबत जनतेला माहिती देणार आहेत. तसेच उद्यापासून राज्यामध्ये पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागचे कारण या संवादादरम्यान मुख्यमंत्री जनतेला सांगणार आहेत.

दरम्यान, ठाकरेंच्या संवादाआधी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यातील स्थितीबाबत महत्वाची मागणी केली आहे. ‘मा. उद्धवजी अपेक्षा करतो की महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला असलेल्या आपल्या भाषणात आपण केवळ मुंबईचे नाही तर अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात ह्याची ग्वाही महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल.’ असा टोला पडळकरांनी लगावला आहे.

पडळकर यांनी राज्यात मोफत लसीकरण करण्याच्या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. तसेच, आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ११ मे पर्यंत राज्यात कोरोनाचे २ लाख ४३ हजार सक्रिय रुग्ण वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच, कुठे तुटवडा जाणवेल याचीही माहिती देण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधेची आकडेवारी बघता महाविकास आघडी सरकारने फक्त मुंबईवरच लक्ष केंद्रित केलं असून इतर जिल्ह्यांमध्ये येत्या काळात स्थिती गंभीर होऊ शकते. मात्र, तशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याच पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.

मुंबई आणि इतर जिल्ह्यांसोबत भेदभाव होत आहे. त्यामुळे तुम्ही फक्त मुंबईचे नाही तर अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात अशी आठवण करून देत असल्याचे सांगत महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जनतेला संबोधित करताना त्याची ग्वाही आपल्या भाषणातून मिळेल अशी अपेक्षा असल्याचा टोला देखील पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!