🕒 1 min read
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २३ वा दिक्षांत समारंभ ४ मे रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) पार पडणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे असणार आहेत.
या समारंभास मुख्य अतिथी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे असणार आहेत. अतिथी मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संचालक प्रा. एस. रामकृष्णन हे असणार आहेत. तर प्रा. रामकृष्णन स्नातकांना उद्देशून दिक्षांत भाषण करणार आहेत. या २३ व्या दिक्षांत समारंभासाठी राज्यशिष्टाचार प्रमाणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र. कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. वसंत भोसले यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे या २३ व्या दिक्षांत समारंभास उपस्थित राहणार आहेत. या समारंभाचे थेट प्रेक्षेपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.srtmun.ac.in) Live – 23rd Convocation Ceremony या लिंकद्वारे करण्यात येणार आहे.
तरी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि पालकांनी विद्यापीठाचा २३ व्या दिक्षांत समारंभ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वर दिलेल्या लिंक द्वारे घरी बसून पाहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे तसेच परिक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. वसंत भोसले यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दसरा मेळाव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
- अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात
- एलआयसीची प्रारंभिक भाग विक्री पुढील आर्थिक वर्षात
- ‘दि सारी स्टोरी’ सईचा मराठमोळा अंदाज पहा फोटोज…
- कुटुंब नियोजनामुळे देशात हिंदुंच्या संख्येत घट; साध्वी प्रज्ञा सिंह यांनी उधळली मुक्ताफळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
