🕒 1 min read
अहमदाबाद : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य दिल्लीच्या संघाने ३ गडी गमावत १७व्या षटकात सहज पार केले. धडाकेबाज अर्धशतकासाठी पृथ्वी शॉला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात दुसऱ्या डावातील शिवम मावीच्या पहिल्याच षटकात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉने सलग ६ चौकार लगावले. सामना संपल्यानंतर जेव्हा ते आमने सामने आले त्यावेळीमावीने ६ चौकार मारल्याबद्दल शॉच्या मानेला पकडत त्याला गमतीने मारण्याचा प्रयत्नही केला. यावरुन या दोन खेळाडूंमध्ये असलेली चांगली मैत्री दिसून आली. कारण जरी मावीने शॉचे मानगुट पकडले तरी ते गमतीने होते, हे व्हिडिओत स्पष्टपणे दिसते.
Once the match is completed, friendship takes over. The beauty of #VIVOIPL????@PrithviShaw | @ShivamMavi23 https://t.co/GDR4bTRtlQ #DCvKKR pic.twitter.com/CW6mRYF8hs
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2021
दिल्लीच्या या विजयात पृथ्वी शॉने आक्रमक अर्धशतक झळकावत मोलाचा वाटा उचलला. या खेळी दरम्यान पृथ्वीने दिल्लीच्या डावाच्या पहिल्याच डावात ६ चौकार ठोकले. हे षटक कोलकाताकडून शिवम मावी टाकत होता. या षटकात पहिला चेंडु वाईड असल्याने एकूण २५ धावा दिल्या. सामना संपल्यानंतर याविषयी प्रतिक्रीया देताना शॉ म्हणाला की,’आम्ही दोघे आता ४-५ वर्षे एकत्र खेळलेलो आहे. त्यामुळे मला माहित होते, तो मला कुठे चेंडू टाकणार आहे. त्यामुळे मी तयारीत होतो.’
महत्वाच्या बातम्या
- मुंबईची बातच न्यारी; पोलार्डने मारला चक्क हेल्मेटने चौकार
- अनेक लोक राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत मात्र कोरोनामुळे थांबलेत, जयंत पाटलांचे मोठे विधान
- सोशल मीडियावर ऑक्सिजन, बेड, औषधासाठी पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करू नका – सर्वोच्च न्यायालय
- गणेश नाईक भाजपची सत्ता येईल म्हणून भाजपवासी झाले, अजितदादांचा टोला
- जालन्यात मृतांना स्मशानात ही जागा मिळेना; ‘मुक्तीधाम’मध्ये पहिल्या शेडचे काम अंतिम टप्प्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
