Share

YCM- वैद्यकीय महाविद्यालयासाठी आमदार लांडगे यांचा पाठपुरावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव स्मृती रुग्णालयात (वायसीएम) वैद्यकीय महाविद्यालयासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई येथे भेट घेण्यात आली.
            पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणा-या यशवंतराव चव्‍हाण स्मृती रुग्णालयात नवीन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था सुरु करण्यात येणार आहे. याबाबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आणि त्यासाठी लागणा-या शुल्कात सवलत मिळावी. यासाठी राज्य शासनाकडे रुग्णालय प्रशासनाकडून पाठपुरावा सुरु होता. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, विद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची गती मंदावली होती.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज आहे. त्यासाठी लागणारे शुल्क भरण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन तयार आहे, अशा आशयचे पत्र महापालिका वैद्यकीय विभागातील मुख्य अधीक्षक यांनी राज्य शासनाकडे पाठवले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेवून तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे लावून धरली आहे.

याबाबत आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने संत तुकारामनगर येथे यशवंतराव चव्‍हाण स्मृती रुग्णालय २५ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आले. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून येथील अनेक पदे रिक्त आहेत. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी वायसीएममध्ये पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परवानगीने या पदव्युत्तर महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना धडे मिळणार आहेत. मात्र, राज्य शासनाच्या ना हरकत प्रमाणपत्राअभावी केंद्र सरकारची मान्यता लांबणीवर पडली होती. मात्र, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, लवकरच रुग्णालयाला ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!