Share

कोरोनामुळे जालन्याच्या टेंभूर्णीतील ग्रामस्थांनी निवडला ‘हा’ पर्याय

Published On: 

जालना: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे तसेच येथील स्थानिक नागरिक तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ देखील अनेक उपाय करत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टेंभूर्णी येथील ग्रामस्थांनी शेतात जाऊन राहण्याचा पर्याय निवडला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व पाच दिवसाचा जनता कर्फ्यू यामुळे टेंभुर्णी गावामध्ये सर्वत्र शुकशुकाट होता. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव करण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी येथील अनेक ग्रामस्थांनी शेतात राहण्याचा पर्याय निवडला. त्या अनुषंगाने येथील बहुतांश कुटुंब आपल्या शेतात राहायला गेले आहेत.

कोरोना प्रादुर्भाव वाढत आसल्याने गावातील नागरिक कोरोना पासून बचावसाठी शेतात स्थलांतर होत आहेत. तसेच टेंभूर्णी परिसरात असलेल्या शेत शिवारामध्ये राहत असलेल्या शेतकऱ्यांमुळे शेत परिसर गजबजला आहे. यातच ढगाळ वातावरण असल्याने शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांकडून शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. यासोबतच कुठल्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची दक्षता या कुटुंबाकडून घेतली जात आहे.

दरम्यान,  लोकांचा संपर्क येणार नाही तसेच गर्दी टाळण्यासाठी येथील ग्रामस्थांनी हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे जवळपास टेंभुर्णीतील ३० ते ४० कुटुंबे सद्यस्थितीत शेतात वास्तव्याला गेले आहेत. दरम्यान, शेत शिवारात स्वच्छ हवा, मुबलक पाणी आणि गर्दीपासून सुटका तसेच स्वतःची काळजी घेणेच कोरोना वरील मोठा उपचार असल्याने शेतात बिऱ्हाड थाटले असल्याचे येथील ग्रामस्थ विष्णू जोशी यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!