उस्मानाबाद: मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे सातत्याने कडक निर्बंध लागू करून तसेच आवाहन करूनही सार्वजनिक ठिकाणावरची गर्दी कमी होत नसल्यामुळे प्रशासनाने आता रस्त्यावर फिरणाऱ्यांचीच अँटेजेन टेस्ट चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. उस्मानाबाद येथे तब्बल ९४ जणांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये नऊजण बाधित असल्याचे दिसून आले. कळंब येथे २० जणांची टेस्ट केल्यावर एकजण पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्वत: जिल्हा रुग्णालयात थांबून मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत रुग्णांच्या नातेवाइकांच्या टेस्ट घेण्यास लावल्या यामध्ये १७ जण बाधित असल्याचे आढळून आले.
दररोज मोठ्याप्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. उपचार करण्यासाठी बेडही शिल्लक नाहीत. अशा परिस्थितीतही नागरिकांना कोरोनाच्या विनाशकतेचे भान राहिलेले नाही. प्रशासनाने कठोर निर्बंध लागू करूनही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांची रस्त्यावर दिसणारी गर्दी हटण्यास तयार नाही. सार्वजनिक ठिकाणी तर बाजार भरल्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे कोरोना प्रादुर्भाव आणखी तीव्रतेने सर्वत्र जाणवत आहे. आवाहन करूनही उपयोग होत नसल्यामुळे प्रशासकीय अधिकारीच आता रस्त्यावर उतरले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी जाऊन विनाकरण फिरणाऱ्यांची टेस्ट केली जात आहे. उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, उपविभागिय पोलिस अधिकारी मोतीराम राठोड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदींनी आपल्या पथकासह ठाण मांडून बाहेर फिरणाऱ्यांना पकडले. यावेळी तब्बल ९३ नागरिकांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये तब्बल नऊ जणांना कोरोनाची बाधा असल्याचे दिसून आले.
महत्वाच्या बातम्या
- दैव बलवत्तर! ऑक्सिजन संपण्याच्या ३० मिनिटांपूर्वी पोहोचला टँकर; ५०० रुग्ण बचावले
- विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांना क्लीन चिट
- कोहली विजयाचा ‘चौकार’ मारण्यासाठी तयार, संजू सॅमसन थांबवू शकणार?
- राज्य केंद्रापुढे हतबल; हात जोइून विनंती करतो, आता तरी मदत करा – राजेश टोपे
- आम्ही पाया पडायला तयार पण केंद्राने राज्याला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा – राजेश टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
