🕒 1 min read
चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
हा सामना जिंकल्यानंतर भारताचा धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सेहवागने ट्विट करत अमित मिश्राचे कौतुक केले आहे. ट्विटमध्ये सेहवाग म्हणतो की, ‘जुनं ते सोनं. अमित मिश्राने आज सिद्ध केले आहे का, तो का आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. आणि दिल्ली संघाने दाखवुन दिले की चेन्नईमध्ये लक्ष्य गाठणे शक्य आहे. हे खरच खुप कौतुकास्पद आहे.’ स्पर्धेत चेन्नई येथे झालेल्या सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघाचा पराभव होत आला आहे.
Old is gold. Amit Mishra proving why he is the second highest wicket taker in the history of IPL with an incredible spell and @DelhiCapitals showing it is possible to chase in Chennai by being sensible.#MIvsDC #IPL2021 pic.twitter.com/aZoEXUMhp9
— Virender Sehwag (@virendersehwag) April 20, 2021
अमित मिश्राने आपल्या आयपीएल कारकिर्दीत १५२ सामन्यात १६४ गडी बाद केले आहेत. यात १७ धावा ५ गडी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. अमित मिश्राने आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सर्वाधिक बळी बाद करण्याच्या यादीत अव्वलस्थानी मुंबई इंडियन्सचा गोलंदाज लसिथ मलिंगा आहे. त्याने १२२ सामन्यात १७० गडी बाद केले आहेत. यात १३ धावा देत ५ गडी बाद करणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
मुंबई विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने अमित मिश्राला अंतिम ११ मध्ये स्थान दिले. अनुभवी गोलंदाज मिश्राने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करत २४ धावा देत चार गडी बाद केले होते. अमित मिश्राने मुंबईचे महत्वाचे फलंदाज रोहित शर्मा, इशान किशन आणि पोलार्ड यांच्यासह राहुल चहरला बाद केले. त्याच्या या गोलंदाजीमुळे मुंबईला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
महत्वाच्या बातम्या
- गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा आळशीपणा; बीडमध्ये सुद्धा मृत शिक्षकाचे नाव कोविड ड्यूटीसाठी पाठवल्याचा प्रकार
- ‘नवाब भाई… राष्ट्रवादीच्या आमदारांनीही रेमडीसीवरचा पुरवठा केला,हा औषधांचा साठा कुठून आला?’
- ‘भाजपने सुडाचे राजकारण थांबवून लोकांचे जीव वाचवावेत’
- महेंद्र सिंह धोनीच्या फॅन्ससाठी मोठी बातमी; धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण
- कठीण काळात मदतीला धावून आले अंबानी, 700 टन ऑक्सिजनचा करणार मोफत पुरवठा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
