Share

आता १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस; मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाचा वाढता धोका पाहता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी अनेक राजकीय नेते आणि वैद्यकीय तज्ञांनी केली होती. लसीकरण ही कोरोनाची साखळी तोडण्याचा एकमेव पर्याय असल्याने आता केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लस उत्पादकांनी 50% साठा राज्य सरकारला द्यावा, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं १ मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बड्या फार्मा कंपन्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

‘आज केंद्र शासनाने १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.’ अशा आशयाचे ट्वीट करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

तसेच केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वागत केले आहे. ‘देर आए दुरुस्त आए… कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीची वयाची अट शिथील करून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याची मागणी मी सातत्याने करत होतो. केंद्र सरकारने ती मान्य केली आता त्यांनी राज्याला लसीचा मुबलक पुरवठा करावा म्हणजे लसीकरण मोहीम वेग घेईल’. अस नाना पटोले म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!