Share

हिंगोलीत युद्ध पातळीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची पालकमंत्री यांची सुचना

Published On: 

हिंगोली : कोरोना रुग्णांची संख्या खुप माेठ्या प्रमाणात हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजन निर्मिती युद्ध पातळीवर करण्याच्या सुचना हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांना सोमवारी दिल्या आहेत.

या बाबत राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी पालकमंत्री यांना या बाबत पत्र पाठवून हिंगोली शहरासह जिल्हाभरात कोरोनाचे रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तसेच उपचारादरम्यान ऑक्सिजनची कमतरता सरकारी तसेच खासगी रुग्णालयांना जाणवत आहे. तर शहरामध्ये तत्काळ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी देखील केली होती. खासदार सातव यांची केलेली मागणी तसेच हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये असलेला तुटवडा बघता पालकमंत्री गायकवाड यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांना शहरामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या सुचना देखील केल्या आहेत.

या निर्णयाने कोरोना संसर्गाने उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांना फायदा होणार आहे. ऑक्सिजन नसल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील खुप मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या खुपच झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही, तसेच रुग्णांचा प्राणवायू  म्हणजेच ऑक्सिजन प्रकल्प लवकरात लवकर उभारण्याच्या सुचना देखील या वेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांनी देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!