औरंगाबाद : महाराष्ट्र सरकारचे कोरोना बाबतचे अपयश झाकण्यासाठी काहीतरी बेताल वक्तव्य मंत्री नवाब मलिक हे करत आहेत. तर त्यांची मानसिकता तपासण्याची गरज असल्याचे मत खासदार डॉ. भागवत कराड यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला इंजेक्शन रेमडीसिविर देऊ नयेत, असे पत्र दिले आहे, असे वक्तव्य केले आहे. खरं तर केंद्र सरकार संपूर्ण स्तरावर महाराष्ट्रास मदत करत आहे. ऑक्सिजन निर्मिती, वाहतूक, पुरवठा, व्हेंटिलेटर व सर्व प्रकारचे औषधी महाराष्ट्राला मिळवण्यासाठी केंद्र सरकार पुढे आहे. तर आज महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे ६० हजार रुग्ण निघाले आहेत. हा कोरोना रुग्णांचा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. राज्य सरकारचे अपयश लपवण्यासाठी मलिक हे काहीतरी बेताल वक्तव्य करत आहेत.
महाराष्ट्रामध्ये सरकार कोरोनाला नियंत्रणात आणण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. केंद्र सरकार हे वाढीव ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची महाराष्ट्राला मदत करत आहे. केवळ टीका करून प्रश्न सुटणार नाहीत. सरकार आणि प्रशासनामध्ये समन्वय नाही. किमान 60 टक्के कोरोना बाधितांचे प्रमाण हे महाराष्ट्रात आहे. यामध्ये लसीकरण असो की ऑक्सिजनची कमतरता, आता रेमडीसिवर इंजेक्शनची टंचाई यामध्ये राज्य सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरले आहे. मंत्री केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारवर टीका करत आहेत. असे खासदार डॉ. भागवत कराड यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजन, रेमडेसिवीरची गरज नाही! केंद्रेकरांनी खासगी रुग्णालयांना फटकारले
- शहरात जोरात नाका बंदी तरीही तीन दुचाकी चोरीला
- प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजन, रेमडेसिवीरची गरज नाही! केंद्रेकरांनी खासगी रुग्णालयांना फटकारले
- विद्यार्थिनीने फी न भरल्याचे सोशल मीडियावर सांगितले, शिक्षिकेवर अॅट्रोसिटी
- लवकरच पुरेसा रेमडेसिवीरचा साठा होणार उपलब्ध, सात रेमडेसिवीर निर्मात्या कंपन्यांशी चर्चा सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

