Share

प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजन, रेमडेसिवीरची गरज नाही! केंद्रेकरांनी खासगी रुग्णालयांना फटकारले

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सर्वच रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते. त्यामुळे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांनांच ऑक्सीजन लावण्यात यावा तसेच ऑक्सीजन वापरतांना अनावश्यक वापर, ऑक्सीजन गळती, इत्यादी बाबीचा जाणीवपुर्वक विचार करावा. तरच भविष्यातील ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीला आळा घालणे शक्य होईल. मंगळवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयात रेमीडिसीवीर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या सुयोग्य वापरासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी खाजगी रुग्णालयांना चांगलेच फटकारले आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुणांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून लिक्वीड ऑक्सीजनसाठा जिल्ह्यात मुबलक उपलब्ध आहे. परंतु भविष्यातील परिस्थितीचा विचार करुन आत्ताच नियोजन करणे गरजेचे असल्याने सर्व रुग्णालयांनी ऑक्सीजनचा सुयोग्य वापर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आज दिल्या. यावेळी सर्व अधिकाऱ्यामसहित लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

पुढे ते म्हणाले, रेमीडिसीवर इंजेक्शनला पर्यायी उपलब्ध असणाऱ्या इंजेक्शनचा वापर करावा. सर्व खाजगी रुग्णालयांच्या प्रत्येक बिलाचे स्वतंत्र ऑडीट करण्यात येणार असून त्या रुग्णालयांनी लेखा परिक्षकाचे नाव, संपर्क क्रमांक, रुग्णालय परिसरात दर्शनी स्थळी लावावी. अन्यथा दोषी रुग्णालयांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी खा. डॉ. भागवत कराड आपल्या जिल्ह्यातील उपलब्ध ऑक्सिजन इतर जिल्ह्यात निर्यात करु नये याबाबत आग्रही भूमिका मांडली. तसेच खा. इम्तियाज जलील यांनी रेमडिसीवर इंजेक्शनच्या अधिक साठ्याबाबत विचारणा केली. तर आ. हरीभाऊ बागडे आणि आ. अतुल सावे यांनी ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांनाच रेमडिसीवर देण्यात यावे, असे निर्देशित केले.

खाजगी रुग्णालयात अवाजवी बील आकारण्यात येत असून त्यावर त्वरीत निर्बंध घालण्याची मागणी आ. संजय शिरसाठ यांनी केली. तर रेमडिसीवर इंजेक्शन हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निगराणीखाली वितरीत करण्यात याव्यात अशा सूचना आ. अंबादास दानवे यांनी केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!