लखनऊ : करोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरूच असून, जवळपास सर्वच राज्यांमध्ये करोनानं हातपाय पसरले आहेत. सगळीकडे रुग्ण आणि नातेवाईकांची बेड आणि ऑक्सिजनसाठी धडपड सुरू असून, आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी रुग्णवाढ सोमवारी समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ७३ हजार ८१० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात १ हजार ६१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील एकूण मृत्यूचा आकडा आता १ लाख ७८ हजार ७६९ वर पोहोचला असून, १२,३८,५२,५६६ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अलहाबाद उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. उच्च न्यायालयाने करोनाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यातील पाच मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउन करण्याचे आदेश दिलेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रयागराज, लखनऊ, वाराणसी, कानपूर आणि गोरखपूरमध्ये २६ एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू करण्याचे आदेश दिलेत. हा निर्णय म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या करोना नियोजनाला मोठा धक्का देणारा निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गलिच्छ राजकारण करू नका, एक दिवस जनता तुम्हाला खड्ड्यात घालेल’
- ‘ठाकरेजी, तुमच्या वाचाळवीरांना आवर घाला’, गाढवाच्या गळ्यात आ.गायकवाडांचा फोटो घालून धिंड
- कचरा टाकणाऱ्यांविरोधात बारापुल्ला गेटलगत बसवल्या लोखंडी जाळ्या!
- कोरोना : लसीकरण गरजेचे, नागरिकांनी सहभाग घ्यावा : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
- ‘राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा,रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

