🕒 1 min read
नवी दिल्ली- महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण अक्षरशः तडफडून जीव सोडत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक गलिच्छ राजकारण करण्यात दंग असल्याचे दिसून येत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड्स, इतर औषधे उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असतानाच राज्यातील राजकारण चांगलच पेटलं असताना आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
जब देश के कोने-कोने से लोग रेमडेसिविर उपलब्ध कराने की गुहार लगा रहे हैं और तमाम लोग जान बचाने के लिए किसी तरह एक शीशी रेमडेसिविर जुटाने के लिए जद्दोजहद कर रहे हैं, उस समय जिम्मेदार पद पर रह चुके भाजपा नेता का रेमडेसिविर की जमाखोरी करने का कृत्य मानवता के खिलाफ अपराध है। pic.twitter.com/arIl5fTnGO
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 19, 2021
जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून रेमडेसिवीरची मागणी होत आहे. प्राण वाचवण्यासाठी रेमडेसिवीर मिळावी म्हणून लोक वणवण भटकत आहेत. त्याचवेळी एका महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या भाजपच्या नेत्याने रेमडेसिवीरचा साठा करणं हे मानवतेच्या विरोधात आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिखर धवनचा जलवा ; काही तासातचं मॅक्सवेलकडून घेतली ऑरेंज कैप
- कोरोना योद्ध्यांच्या मानधनात दुजाभाव; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- दिलासादायक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नेझेल स्प्रे ठरतोय ९९ टक्के प्रभावी
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- ‘निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

