मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे.
त्याचप्रमाणे असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी करोनावर मात केली आहे आणि बरे होत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ या दोघांना करोनाची लागण झाली होती. आता दोघेही कोरोनातून बरे झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी विकी कौशलने करोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोशल माध्यमाद्वारे दिली होती. त्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफने देखील ती पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. नुकतीच विकीने तो करोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ कतरिनाने देखील तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी चाहत्यांना दिली. पण या दोघांना कोरोना झाला आणि दोघे एकत्र बरे झाले हे काही चाहत्यांना भावले नाही. त्यामुळे आता चाहत्यांनी या गोष्टींमधले साम्य शोधून काढले आणि तर्क लावू लागले आहेत. हे दोघेजण सोबत होते म्हणून यांना कोरोना झाला असावा हे दोघेजण आता नात्यात असावे असे देखील चाहते तर्क लावत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- हैद्राबादच्या सलग तीन पराभवानंतर मेंटॉर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी घेतली खेळाडूंची शाळा
- गर्दी कमी झाली नाही तर, कडक लॉकडाऊन करणार : पालकमंत्री अशोक चव्हाण
- नगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करा, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन
- वॉर्नर, विल्यमसननं राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा
- खा.भावना गवळी यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

