Share

पंजाबचा कर्णधार राहुलच्या रणनितीवर आशिष नेहराने व्यक्त केली नाराजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्स संघाने पंजाब किंग्सच्या संघाचा ६ गडी राखुन दणदणीत विजय मिळवत दमदार पुनरागमन केले आहे. पंजाब किंग्सने दिलेले १९६ धावांचे कठिण लक्ष्य चार गडी गमावत १९व्या षटकातच पार केले. धावांचा पाठलाग करताना ९२ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने चांगली कामगीरी करत संघाला १९५ धावांची मजल मारुन दिली. मात्र या सामन्यातील दुसऱ्या डावातील कर्णधार राहुलच्या रणनीतीवर भारताचा माजी खेळाडू आशिष नेहराने नाराजी व्यक्त केली आहे. एका खाजगी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नेहरा म्हणाला की, ‘संघातील सर्वात महागड्या गोलंदाजाला तुम्ही गोलंदाजी देत नाही. मुख्य गोलंदाज मेरेडिथला १०व्या षटकानंतर गोलंदाजी देण्यात आली. विशेष म्हणजे मेरेडिथने पहिल्याच षटकात स्टीव्ह स्मिथला बाद केले. धावांचा पाठलाग करताना नवोदीत गोलंदाजासोबत सामन्याची सुरुवात करणे म्हणजे सामन्यावरील नियंत्रण गमावण्यासारखे आहे.’ असे नेहरा म्हणला.

जर हीच रणनीती असेल तर के एल राहुलने सलामीला शाहरुख खान किंवा शमीला पाठवावे असा खोचक सल्लाही नेहराने दिला. संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळेसोबत कर्णधार के एल राहुलला चर्चा करण्याची आवश्यकता आहे. या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सच्या संघाने पंजाबच्या संघाचा ६ गडी राखुन पराभव केला होता. पंजाबचा हा सलग दुसरा पराभव आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!