परभणी : जिल्ह्यामध्ये असलेल्या सर्व तालुक्यामध्ये तालुकास्तरावरच्या ५० बेडचे कोविड सेंटर उभारणी करण्याची मागणी माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर यांची परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवदनाच्या पत्राव्दारे मागणी केली आहे. या निवेदनामध्ये लोणीकर म्हणाले की महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात कोराना रुग्णांचा कहर वाढला आहे.
निवेदनामध्ये पुढे ते म्हणाले की, कोरोना माहामारीमुळे सामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. तर परभणी शहरामधील कोरोनाचे कोविड रुग्णालये रुग्णामुळे फुल्ल भरले आहेत. दरम्यान परभणी जिल्ह्यातील सर्व तालुकाभरामध्ये जर कोव्हिड रुग्णालये उभारली तर परभणी शहरामधील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करता येवू शकतील. ग्रामीण भागातून खुप मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे परभणी शहरातील सर्व रुग्णालयामधील यंत्रणा तसेत मनुष्य बळावर त्यांचा ताण देखील पडत आहे. हा ताण देखील ही रुग्णालये बांधल्याने कमी होवू शकतो.
परभणी जिल्हाभरातील सर्व तालुक्यातील रुग्णांची त्या – त्या तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणे सोयीचे तसेच सुलभ देखील होतील. तसेच परभणी येथे उपचारासाठी येणारे रुग्ण तसेच नातलगांची गर्दी देखील कमी होणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील सेलू, पाथरी, मानवत, पुर्णा, सोनपेठ, पालम, गंगाखेड, जिंतूर तालुक्यामध्ये प्रत्येकी ५० खाटांचे बेड असेलेल्या कोव्हिड सेंटरची उभारणी केली तर, रुग्णालयामध्ये बेड, ऑक्सिजन, पल्स रेट तपासणी, व्हेंटीलेटर्स, डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छतागृहांसह रुग्णांलयांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा करव्यात. या सुविधा करण्यासाठी लागणारा निधी तेथील स्थानिक आमदार फंड, जिल्हा नियोजन समितीकडून या रुग्णालये उभारणीसाठी विशेष निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीचे पत्र जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठवले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून आमदार बबनराव लोणीकर यांनी ही मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रेमडेसिवीरचा साठा करणं हे मानवतेच्या विरोधात आहे; प्रियंका गांधींची फडणवीसांवर टीका
- कोरोना योद्ध्यांच्या मानधनात दुजाभाव; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
- दिलासादायक : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी नेझेल स्प्रे ठरतोय ९९ टक्के प्रभावी
- …तर विरोधी नेत्यांना देखील रेमडेसिवीरच श्रेय घेता आलं असतं – संजय राऊत
- ‘निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

