🕒 1 min read
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानातील भक्ती या वाघिणीने काही दिवसांपूर्वी दोन बछड्यांना जन्म दिला होता. मात्र तिच्यात आईची माया नसल्याने ती आपल्या बछड्यांना दूध पाजण्यास तयार नव्हती. एके दिवशी तर तिने फिरत असतांना एका बछड्यावर पाय दिल्यामुळे त्या बछड्याने जीव सोडला. तर दुसऱ्या बछड्याची प्रकृती देखील दिवसेंदिवस खालावत होती. अखेर बुधवारी (दि.१४) रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याने देखील आईच्या प्रेमाची करुणा भाकत जीव सोडला. त्यामुळे शेवटपर्यंत भक्तीने आपल्या दोन्ही बछड्यांना आईच्या मायेने जवळ घेतले नाही.
३ एप्रिलला प्राणिसंग्रहालयातील भक्ती या पिवळ्या वाघिणीने दोन गोंडस बछड्यांना जन्म दिल्याने आनंदाचे वातावरण होते. हे दोन्हीही बछडे पांढर्या रंगाचे होते. मात्र बछड्यांना जन्म दिल्यानंतर भक्तीने तिच्या पिलांकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे बछड्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी प्राणिसंग्रहालयातील केअर टेकर यांच्यावर आली. पालिका प्रशासनाने बछड्यांच्या निगराणीसाठी चोवीस तास केअर टेकर नियुक्त केले होते.
पिंजर्यात सीसीटीव्ही लावले. त्याच्या माध्यमातून बछडे आणि त्यांच्या आईच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. रोज ठराविक वेळेने या बछड्यांना बकरीचे दुध बाटलीने पाजले जात आहे. आईच्या दुधात आणि बकरीच्या दुधात फरक आहे. बकरीच्या दुधामुळे बछड्यांमध्ये शक्ती आलेली नव्हती. त्यातच भक्तीने पिंजऱ्यामध्ये फिरत असतांना एका बछड्यावर पाय दिल्यामुळे १० एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता एका बछड्याचा मृत्यू झाला.
दुसऱ्या बछड्याची तब्येत देखील दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्याला जगण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र त्या बछड्याला जगण्यासाठी आईच्या दुधाबरोबरच आईचे प्रेम आणि माया देखील आवश्यक आहे. मात्र आईचे प्रेम देण्यास प्रशासन अपयशी अखेर अपयशी ठरले. १४ एप्रिल रोजी सकाळपासूनच दुसऱ्या पिल्लाची प्रकृती खराब झाली होती. अखेर रात्री त्याने प्राण सोडला.
महत्त्वाच्या बातम्या
- फोन कोणत्या तोंडाने करायचा ?असा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले असावे
- कोरोना रुग्णांकरीता ऑक्सिजन मिळवण्याचा प्रवास झाला सोप्पा!
- मोठी बातमी : कडक निर्बंधांना कोणी जुमानेना, आता निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता !
- कुस्ती स्पर्धांना परवानगी द्या, कुस्तीपटूंना आर्थिक मदत देण्याची मागणी
- ‘आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

