Share

तीन दिवस रांगेत थांबूनही रेमडिसिव्हीर मिळेना, पुण्यात रुग्णांच्या नातेवाईकांचे आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

पुणे – पुण्यात कोरोनामुळे परिस्थिती बिकट बनत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा जाणवत असून पुणे शहर आणि जिल्ह्यातही हे इंजेक्शन उपलब्ध होत नाहीये. त्याच्या निषेधार्थ आज(दि.१५) सकाळपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

राज्यात कोरोचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढ आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्याही जास्त झाली आहे.रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने बेडही मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुरु असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा आणि औषधाचा तुटवटा जाणवू लागला आहे.

या संदर्भात बोलताना एका रुग्णाच्या मुलीने सांगितले की,माझे वडील 3 दिवसांपासून ससून च्या काळेवाडी येथील रुग्णालयात भरती आहेत. सुरुवातीला बेड मिळत नव्हता आता रेमडिसिव्हीर या औषधासाठी मी तीन दिवस रांगेत उभी आहे. मात्र अजून पर्यंत औषध मिळाले नाही. म्हणून आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वकाराला आहे.

ज्यांच्याकडे पैसा आहे ते जादा दराने पैसे घेऊन औषध खरेदी करतात मात्र सर्वसामान्य माणसांनी कसं करायचं? आणि माझा बाप जगणार कसा? असा थेट सवाल या मुलीने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!