मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्या माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.या परीक्षा आता येत्या जून महिन्यात घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.
या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान, यापूर्वीच दहावी आणि बारावी राज्य मंडळाच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानूसार, दहावीच्या परीक्षा जूनमध्ये, तर बारावीच्या परीक्षा मे महिन्यांत होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस, वीज कोसळून शेतकरी ठार
- ‘देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का?’
- बीडमध्ये धुम स्टाईल चोरी, चालत्या टेम्पोतून ७२ हजारांचे एलईडी गायब
- पुण्यातील सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना ‘नो एन्ट्री’, महापालिकेचा आदेश
- ‘जयंत पाटील यांच्या सभेत पाऊस आला आणि विरोधकांनी त्याचा धसकाच घेतला’


