🕒 1 min read
हरिद्वार: देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच, येत्या काळात अनेक राज्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मात्र या बिकट परिस्थितीत देखील हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतल्यानंतर. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा भीती व्यक्त केली होती. यातच आता, या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ तर सोमवार आणि मंगळवारी या मेळाव्यात तब्बल हजार रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा विस्फोट झाला आहे. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे.
What you are seeing is not KUMBH MELA but it’s a CORONA ATOM BOMB ..I wonder who will be made accountable for this VIRAL EXPLOSION pic.twitter.com/bQP9fVOw5c
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) April 13, 2021
दरम्यान, या मुद्यावरून बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कुंभमेळ्यातील गर्दी पाहून नाराजी व्यक्त केली आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विटर अकाऊंटवर कुंभमेळ्यातील अफाट गर्दीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘तुम्ही पाहात असलेला कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे. मला आश्चर्य वाटते की या एक्सप्लोजरचा दोष कोणाला द्यायचा’ या आशयाचे कॅप्शन रॅम गोपाल यांनी दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस, वीज कोसळून शेतकरी ठार
- ‘देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का?’
- बीडमध्ये धुम स्टाईल चोरी, चालत्या टेम्पोतून ७२ हजारांचे एलईडी गायब
- पुण्यातील सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना ‘नो एन्ट्री’, महापालिकेचा आदेश
- ‘जयंत पाटील यांच्या सभेत पाऊस आला आणि विरोधकांनी त्याचा धसकाच घेतला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

