Share

लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची वेळ आणू नका, पालकमंत्री अमित देशमुख यांचे आवाहन

Published On: 

लातूर: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे, राज्य सरकारने कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी दुसरा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सर्वांनी घरात सुरक्षित राहावे. विनाकारण बाहेर फिरू नये. दुसऱ्या लॉकडाऊनची १५ दिवसांची मुदत वाढविण्याची वेळ आणू नका, असे कळकळीचे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषेद्वारे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा प्रशासकीय आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री देशमुख म्हणाले, कोरोना महामारी झपाट्याने पसरत आहे. ३० एप्रिलपर्यंत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा अंदाजतज्ज्ञांचा आहे. त्यामुळे स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी घरात राहा. विषाणूची साखळी तुटली तरच दुसरी लाट संपुष्टात येऊ शकते. मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास प्रशासनाला कठोर पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खाटावरील रुग्ण लवकर बरे होतील, यासाठी प्रयत्न केले जात आहे.

जिल्ह्यात २०० रुग्णालये आहेत. कोविड हॉस्पिटल वाढविले जातील. शासकीय रुग्णालयात १२० खाटा वाढविण्यास अधीष्ठातांना सूचविले आहे. मनपाने १८२ खाजगी हॉस्पिटलची नोंदणी करुन त्यांना कोविड व नॉन कोविड उपचारास परवानगी दिली आहे. इमा संघटनेच्या डॉक्टरांकडूनही कोविड सेवा देऊ शकणाऱ्या हॉस्पिटलची यादी मागविली आहे, असे सांगून पालकमंत्री देशमुख म्हणाले, ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने धावपळ होत आहे. पण आवश्यक तेवढा ऑक्सिजन उपलब्ध होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!