चेन्नई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला ९ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. मात्र, हे सीजन सुरु होण्याआधीपासून या सीजनवर कोरोनाचे सावट पडलेले दिसले. आयपीएल सामन्यांपूर्वी खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यांनतर आयपीएल सुरु असताना देखील खेळाडूंना कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे संघ सध्या चिंतेत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला. त्यांचा वेगवान गोलंदाज एनरीच नॉर्खियाला कोरोनाची लागण झाली आहे. पॅगिसो रबाडाही त्याच्यासोबत सात तास विमान प्रवासात होता, मात्र पॅगिसो रबाडाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
एन्रीच नॉर्खिया आणि पॅगिसो रबाडा हे दोघेही दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू मुंबईमध्ये क्वारंटाइन आहेत. मात्र, दिल्ली कॅपिटल्स आणि आयपीएल प्रशासनाकडून अद्यापि याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- कोराेना रुग्णांचा विक्रम , परभणीत १ हजार १७२ व्यक्ती कोरोनाबाधित, २० बाधितांचा मृत्यू
- खा त्यांचं मटण आणि दाबा आमचं बटन ; गुलाबराव पाटलांची खास शैलीत फटकेबाजी
- शिवसेनेच्या ढाण्या वाघाची कानडी भूमीत डरकाळी; संजय राऊतांचा भव्य ‘रोड शो’
- परभणी पोलिस दलातील ११२ अधिकारी – कर्मचारी कोरोना बाधीत
- नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा; मुख्यमंत्र्यांनी दिले सक्त आदेश


