Share

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्याही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर आता वैद्यकीय अभ्यासक्रमाच्याही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

या संदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अनेक विद्यार्थ्यांना कारोनाचा संसर्ग झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांनी पत्रात लिहिले की, ‘सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आलेला आहे. अशात परीक्षा होणार असल्याने वैद्यकीय विभागावर ताण वाढण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे आढळून येत आहे. तसेच कोरोना वाढीची तीव्रता विचारत घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. सदर बाब विचारात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.

वास्तविक एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले आहेत. यातील एक गट परीक्षा पुढे ढकलण्याच्या बाजूने तर दुसरा विरोधात असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात आता वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षांबाबतही असाच काहीसा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, केवळ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या तर ते विद्यार्थी इतर राज्यातील विद्यार्थ्यांच्या मागे राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!