बीड: एकीकडे कोरोनाचे थैमान तर दुसरीकडे उपचारासाठी लागणाऱ्या पैशांमुळे सर्वसामान्यांचे हाल, अशा परिस्थितीतही मुदतबाह्य रेमडेसिव्हीर इंजेक्शनची सर्रास विक्री होताना दिसत आहे. या बाबत चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मुदत संपली तरी सर्रासपणे विक्री सुरु आहे. यामुळे रुग्णांचा जीव वाचावण्या ऐवजी धोक्यात घातला जातोय. मुदतबाह्य औषधांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यंनी औषधांबाबत सुरु असलेल्या काळा बाजारावर लक्ष वेधेले. आष्टी तालुक्यातील अनेक कोरोनाबाधित रुग्ण अहमदनगर येथे उपचारासाठी जातात तिथे डिसेंबर मध्येच मुदत संपलेले रेमडेसिव्हीर इंजेक्शन सर्रासपणे वापरात असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अनेक ठिकाणी रेमडेसिव्हीर इंजेक्शन चढ्या दराने विकले जात असल्याचे तसेच या औषधांचा काळा बाजार होतानाचे अनेक प्रकार समोर येत आहेत. सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी हा खेळ केला जात आहे, त्यामुळे अशा प्रकारे रुग्णांची लूट करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचे सूर बदलले, म्हणाले…
- लातूर; बारा लाख शेतकऱ्यांनी भरले ११६० कोटी वीजबिल
- ‘…आणि डिव्हिलियर्सने हा सामना आरसीबीकडे झुकवला’ , रोहितने सांगितलं मुंबईच्या पराभवाचं कारण
- राज्यात कोरोनाचा उद्रेक, सोनिया गांधी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार
- शिक्षकांचे राज्यस्तरीय ऑनलाईन संमेलन उद्या; प्रत्येक जिल्ह्याच्या तीन शिक्षकांचा होणार सन्मान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

