Share

लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचे सूर बदलले, म्हणाले…

Published On: 

अहमदनगर : राज्यात अंशतः आणि आठवड्याच्या अखेरीस कडक लॉकडाऊन लावूनसुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आणखी कडक निर्बंध लावण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध हाच पर्याय सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे.

दरम्यान, सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या कॉंग्रेसने याआधी लॉकडाऊनला विरोध केला होता. मात्र आता कॉंग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे सूर आता बदलेले दिसत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी आणखी कडक निर्बंध राज्यात लागू करण्याबाबत सुतोवाच केलं आहे. त्यामुळे थोरातही तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनला अनुकूल असल्याचं बोललं जात आहे.

राज्यात अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाची साखळी तोडून कोरोनाबळींची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. मृत्यूंची संख्या वाढते ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं थोरात यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!