🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगालसह पाच राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. या महत्त्वाच्या आणि राजकीय दृष्ट्या निकालाच्या मानल्या जाणाऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाली भाषेचा वापर करत बंगाली लोकांना भावनिक साद घातली आहे. मोंदीनी सोशल मिडीयावर बंगाली भाषेत पोस्ट करत मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे.
वास्तविक निवडणूक रणधुमाळीच्या आधीपासूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘आपला माणुस’ असा प्रचार सुरू केला होता. त्याचा परिणाम पश्चिम बंगालमधील निवडणुकीतही दिसेल असेच चित्र होते. हिंदी भाषा असलेल्या लोकांना पश्चिम बंगाल आणि इथल्या भाषेविषयी आस्था नसल्याचा प्रचार या निवडणुकीत सुरू होता. त्याला उत्तर देण्यासाठीच मोदी यांनी बंगाली भाषेत भावनिक आवाहन केले असल्याचे दिसून येत आहे.
পশ্চিমবঙ্গে চতুর্থ দফার ভোট শুরু হয়েছে। আজকের ভোটদাতাদের কাছে রেকর্ড সংখ্যায় ভোটদানের আহবান জানাচ্ছি। তরুণ ও মহিলা ভোটারদেরও বিপুল সংখ্যায় ভোটদানের অনুরোধ জানাচ্ছি।
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2021
बंगाली ही प्रामुख्याने पश्चिम बंगालसह त्रिपुरा आणि असाम राज्यात बोलली जाणारी भाषा आहे. तसेच बांग्लादेशाची ही राष्ट्रभाषा आहे. या आधी देखील मोदी यांनी बांग्लादेशाच्या स्वातंत्र्य युद्धाबाबत वक्तव्य केले होते. आता पुन्हा या भाषेचा वापर करत मोदींनी मतदारांना विशेष करुन महिला आणि युवकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मोदी यांच्या या भाषा कार्डचा वापर किती होतो, ते तर निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सामान्य जनतेसाठी कायम कार्यरत असलेला एक समर्पित लोकप्रतिनिधी हरपला’
- आम्ही आतंकवादी नाही, आमचा हक्क मागायला आलोय – निलेश राणे
- कोरोना निर्बंध आणखी कडक करण्याची तयारी, सर्वपक्षीय बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष
- हर्षल पटेलची कमाल कामगिरी ; रोहित शर्माचा 12 वर्षाचा रेकॉर्ड मोडीत
- चिंताजनक! लातूर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

