सांगली : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग फोफावत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र निर्माण झाल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, नियमांचे पालन न झाल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध देखील लावले जात आहे.
यामुळे या गंभीर स्थितीतून सावरण्यासाठी सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा काटेकोरपणे वापर करणे, हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मास्क लावणे म्हणजे मास्क लावण्याची गरज नसल्याचं वक्तव्य केलं आहे. यासोबतच पुढे त्यांनी अश्लाघ्य भाषेचा देखील वापर केला आहे.
याआधी देखील अनेक वादग्रस्त विधानामुळे संभाजी भिडे गुरुजींवर टीका करण्यात आल्या होत्या. तर त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. आता, ‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. कोणत्या नालायकाने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे,’ असं वादग्रस्त भाष्य भिडेंनी केलं आहे.
एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे? मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असं देखील भिडे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘आपले अपयश झाकण्यासाठीच केंद्रिय आरोग्य मंत्र्यांनी पत्रक काढून उर बडवायला सुरवात केलीय’
- ‘चेन्नई सुपर किंग्स पहिल्या चारमध्ये स्थान मिळवू शकणार नाही’ ; तीन माजी क्रिकेटर्सचं विधान
- लसीकरणासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, धनंजय मुंडेंचे आवाहन
- फोर्ब्सच्या धनकुबेरांच्या यादीत सायरस पूनावाला प्रथमच पहिल्या दहात सामील
- निलेश राणे यांच्या सुचनेनंतर लांजा कोविड सेंटर सुरु करण्याला आला वेग


