Share

‘गोकुळ’च्या निवडणुकीची घोषणा; सत्ताधारी गटाला सतेज पाटील दणका देणार ?

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : गेले काही महिने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. सद्याच्या स्थितीत निवडणूक घेण्यास सत्ताधारी गटाचा विरोध होता. मात्र, अखेर आज गोकुळच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने आज या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार गोकुळसाठी 2 मे रोजी मतदान पार पडणार आहे. जिल्ह्याचं प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून ‘गोकुळ’ला ओळखलं जातं. या दूधसंघाच्या चाव्या आपल्याच गटाला मिळाव्यात म्हणून राजकीय नेत्यांनी देखील आता तशा हालचाली सुरु केल्या आहेत.

कसा आहे निवडणुकांचा कार्यक्रम –

  • 25 मार्च ते 1 एप्रिल – उमेदवारी अर्ज भरणे
  • 5 एप्रिल – उमेदवारी अर्जाची छाननी
  • 6 एप्रिल – वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे
    6 ते 20 एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी
  • 22 एप्रिल – उमेदवारांना चिन्हांचे वाटप
  • 2 मे – मतदान
  • 4 मे – मतमोजणी

दरम्यान, कालच विरोधी शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. तर, सत्ताधारी गटाच्या देखील बैठक सुरु झाल्या आहेत. सत्ताधारी आघाडीला दणका देत पालकमंत्री सतेज पाटील यांनी अनेक संचालकांना विरोधी आघाडीत सहभागी करुन घेतलं आहे.

गोकुळ दूध संघावर सध्या माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता आहे. या सत्ताधारी आघाडीला धोबीपछाड करण्यासाठी सतेज पाटील यांच्यासह ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि खासदार संजय मंडलिक हे एकवटले आहेत. शाहू विकास आघाडीचं सत्तेत येणार असं देखील सतेज पाटील यांनी भाकीत केलंय.

गोकुळवर सत्ता असलेले महाडिक हे भाजपचे तर पी एन पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. सत्ताधारी गटाचे 6 संचालक विरोधी आघाडीकडे गेले आहेत. यंदा अनेक मातब्बर नेते या निवडणुकांसाठी इच्छुक असून या दोन्ही आघाड्या कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!