🕒 1 min read
नांदेड : भोकर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली होती. एका शेतकऱ्याच्या पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी भोकर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रति जलदगती न्यायालयाप्रमाणे सदरील गंभीर गुन्ह्याचा निकाल अवघ्या तेवीस दिवसात दिला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात १९ दिवसात तातडीने तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. २० जानेवारी २०२१ रोजी नांदेड जिल्ह्यातील दिवशी इथे अत्याचार आणि हत्येची घटना घडली होती. सालगड्याने आपल्याच शेतमालकांच्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली होती
आरोपी बाबूराव सांगेराव हा घटनास्थळी दडून बसला होता. गायब झालेल्या मुलीचा शोध घेत असताना आरोपी गावकऱ्यांना सापडला. त्याचवेळी पोलीस तिथे आल्याने जमावाच्या तावडीतून आरोपी बचावला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास पूर्ण केला. या प्रकरणी पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने तत्पर सुनावणी पूर्ण केली.
काय झाले होते त्या दिवशी?
भोकर तालुक्यातील दिवशी येथील पाच वर्षीय बालिका आपल्या आई- वडिलांसोबत शेतात गेली होती. २० जानेवारी रोजी सकाळी सात ते दहाच्या सुमारास तिच्या घरची मंडळी शेतातील कांदे काढत होते. यावेळी बाबूराव सांगेवार याने म्हैस व अन्य जनावरे चारुन आणुन गोठ्यात बांधले होते. यानंतर त्याने शेतमालकाच्या बालिकेला उचलून नेले. एका नाल्यात गेल्याने तिला आणण्यासाठी गेल्यानंतर नराधम सालगडी बाबूराव सांगेवार याने पिडीत बालिकेला आमिष दाखवून काही अंतरावर नदी परिसरात उचलून नेले. एका नाल्यात तिच्यावर त्याने पाशवी अत्याचार केला एवढेच नाही तर तिचा गळा आवळून नदीपात्रात फेकून दिले. बाजूच्या बेशरम व पानसरांच्या झाडीत तो नग्न अवस्थेत लपून बसला.
तिकडे बालिकेचा शोध सुरु झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार पालकांच्या समोर पडला. मृत अवस्थेत सदर बालिकेच्या शरीरावर जवळपास 47 जखमा झाल्या होत्या. मृतदेहाच्या बाजूलाच आरोपीचे बूट, कपडे व पाकीट आढळून आले होते. त्याचा शोध घेतला असता तो एका झुडूपात दडून बसला होता. त्याला ताब्या घएऊन भोकर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी बाबूराव सांगेवार याच्याविरुद्ध खून, अपहरण, अनैसर्गिक अत्याचार, अत्याचार यासह बाललैंगिक अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसींसाठी ओबीसी मंत्री, मराठ्यांसाठी मराठा मंत्री मग दलित-मागास वर्गासाठीच अजित पवार का ?’
- अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न फडणवीस हे करत आहेत ?
- परमबीर सिंह यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार; देशमुखांच्या अडचणी वाढणार ?
- औरंगाबादनंतर जालन्यातही होणार कॅन्सर हॉस्पिटल, राजेश टोपेंची माहिती
- सरकार मधल्या मंत्र्यानीच एकमेकाची जिरवायला सुरुवात केली आहे – निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

