🕒 1 min read
औरंगाबाद : शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे मेल्ट्रोन हॉस्पिटल DCHC म्हणून काम करणार आहे. मेल्ट्रोन हॉस्पिटल मधील अत्यंत गंभीर रुग्ण घाटी हॉस्पिटलमध्ये दररोज आवश्यकतेनुसार शिफ्ट होतील. त्याचवेळी घाटी रुग्णालयाचे जवळपास दीडशे रूग्ण जे गंभीर होते अशा रुग्णांना घाटी येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेल्ट्रोन मध्ये शिफ्ट केले जाईल. प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय बोलत होते.
अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या मेल्ट्रोन कोविड सेंटरची क्षमता ३५० खाटांची आहे. त्यापैकी १५० खाटा घाटी रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात पाच ते सहा दिवस उपचार घेतलेले रुग्ण व ज्या रुग्णांचे लक्षणे कमी झाले आहेत अशा रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २२) प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मेल्ट्रोन कोविड सेंटरला भेट देत पाहणी केली.
यावेळी पांडेय यांनी मेल्ट्रोन येथील सर्व डॉक्टरांची बैठक घेऊन रुग्णसेवेत कुठलाही कसूर करू नये, काही अडी अडचणी असल्यास त्या तातडीने सोडवल्या जातील, तसेच इंजेक्शन व औषधी यांचा पुरवठा तात्काळ करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ. बि. डी. राठोड यांना दिले. याप्रसंगी त्यांच्या समवेत शहर अभियंता एस. डी. पानझडे, आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. राठोड, डॉ. वैशाली मुगदडकर , सिद्धार्थ बनसोड, जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार हे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी रुग्णालयातील सोयी-सुविधांची संपूर्ण पाहणी केली. रुग्णांशी संवाद साधला. तसेच डॉक्टरांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या तातडीने सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. तसेच सुरक्षारक्षकाला मास्क शिवाय रुग्णाच्या नातेवाईकाला परिसरात प्रवेश देऊ नये, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसींसाठी ओबीसी मंत्री, मराठ्यांसाठी मराठा मंत्री मग दलित-मागास वर्गासाठीच अजित पवार का ?’
- अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न फडणवीस हे करत आहेत ?
- परमबीर सिंह यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार; देशमुखांच्या अडचणी वाढणार ?
- औरंगाबादनंतर जालन्यातही होणार कॅन्सर हॉस्पिटल, राजेश टोपेंची माहिती
- सरकार मधल्या मंत्र्यानीच एकमेकाची जिरवायला सुरुवात केली आहे – निलेश राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

