🕒 1 min read
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली होती. यावर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत.परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रावरुन काल संसदेत भाजपा चांगलीच आक्रमक झाली होती.
काल संसदेत बोलताना भाजप नेत्यांनी महाराष्ट्तील सरकार बरखास्त करावं अशी मागणी केली होती. एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी आपल्या पत्रातून सरकार, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर प्रश्न उपस्थित करतात असं सांगत भाजप नेत्यांनी संसदेत गोंधळ घातला.महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी देखील भाजपाने केली होती.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे शिवसेना नेते खा.संजय राऊत हे सरकारचा बचाव करत असतात. सिंग यांच्या पत्रानंतर राऊत यांच्या वेळोवेळी बदललेल्या भूमिकेवर आता टीका होऊ लागली आहे. संजय राऊत यांचा समाचार हा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी घेतला आहे. ‘संज्या राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही’ अअशी टीका राणे यानी केली आहे.
संज्या राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही.
पहिला दिवस- मला काय आरोप झालेत माहीत नाही.
दुसरा दिवस- मंत्र्यांनी पाय जमिनीवर ठेवले पाहिजे.
पवार साहेबांच्या स्टेटमेंट नंतर- परमबीर सिंह BJP चे दरलींग, केंद्र सरकार बरखास्त करा.
संज्या काहीतरी नितीमत्ता असली पाहिजे माणसात.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 23, 2021
निलेश राणे म्हणाले की ‘संज्या राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही. पहिला दिवस- मला काय आरोप झालेत माहीत नाही. दुसरा दिवस- मंत्र्यांनी पाय जमिनीवर ठेवले पाहिजे. पवार साहेबांच्या स्टेटमेंट नंतर- परमबीर सिंह BJP चे दरलींग, केंद्र सरकार बरखास्त करा. संज्या काहीतरी नितीमत्ता असली पाहिजे माणसात.’ अस ट्विट करुण त्यांनी संजय राऊत वर प्रहार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- यू ट्यूब घेत आहे नवीन फिचरची चाचणी; कॉपी कंटेंटला बसणार चाप
- पोलीस दलात बदल्यांचे मोठे रॅकेट, पुरावे घेऊन फडणवीस दिल्लीला रवाना
- परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका खोटी आहे का ?
- भाजपा महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि गुजरातसाठी दुसरा न्याय का लावत आहे ?
- ‘भारतमातेच्या सुपुत्रांच हे बलिदान देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत बनून राहील’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

