🕒 1 min read
औरंंगाबाद : शहरातील दोन सराफा व्यापा-यांचे जवळपास २१ लाख ३० हजार रूपये किंमतीचे ७७ तोळ्यांचे दागिने घेऊन बंगाली कारागिर पसार झाला आहे. हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शेख असद्दुल शेख लियाकत (रा. मोमीनपुरा, मुळगाव मालबा, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) असे या कारागिराचे नाव आहे. त्याच्याविरुध्द सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोतील अजय गोवर्धनदास मेवलानी (वय ४५, रा. प्लॉट क्र. ५४०, सिडको एन-३) यांच्या कासारी बाजार आणि मुलमची बाजार अशा दोन ठिकाणी दुकाना आहेत. त्यांची शेख असद्दुल याच्याशी चार ते पाच वर्षांपुर्वी ओळख झाली होती. या ओळखीतून मेवलानी हे नेहमी शेख असद्दुलला कच्चे सोने दागिने घडविण्यासाठी द्यायचे. त्यानंतर घडविलेले दागिने चार ते पाच दिवसात शेख असद्दुल मेवलानी यांना आणून द्यायचा. त्यानंतर ठरल्यानुसार त्याला मजूरी दिली जायची.
अशात देखील मेवलानी यांनी त्याला सोन्याचे बिस्किट, लगड आणि दुरूस्तीसाठी म्हणून तब्बल ५४ तोळ्यांचे दागिने दिले होते. मात्र, हे दागिने घेतल्यावर शेख असद्दुल परत मेवलानी यांच्याकडे फिरकलाच नाही. ५ मार्च रोजी सायंकाळी त्यांच्यामध्ये दागिन्यांचा व्यवहार झाला होता. बरेच दिवस वाट पाहून मेवलानी यांनी शेख असद्दुल याचे मोमीनपुरा भागातील घर गाठले. तेव्हा तो घरी नव्हता तसेच त्याचा मोबाईल सुध्दा बंद होता. अशाच प्रकारे आणखी एका सराफा व्यापा-याने त्याला २६ तोळ्यांचे दागिने दिले आहेत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेवलानी यांनी बुधवारी सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तर एका व्यापा-याने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक मुजगुले करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- जबरदस्तीने वीजबिल वासून कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा
- योगीजींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश निरंतर प्रगतीपथावर राहून ‘सर्वोत्तम प्रदेश’ बनावा – नाईक
- मुंबईत आज पासूनच कडक निर्बंध लागू होऊ शकतात – महापौर किशोरी पेडणेकर
- सचिन वाझे आणि हिरेन यांचे ‘ते’ सीसीटीव्ही फुटेज आले समोर
- कर्नाटकने महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना बंदी घातली


