देहू : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यामुळे राज्यभरात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. आषाढी, कार्तिकी, माघी यात्रेनंतर आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळ्यासाठी देखील भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे वारकरी संप्रदायात देखील तीव्र नाराजी आहे. मात्र, कोरोनाचा वाढत धोका लक्षात देहूतील या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नियमावली जाहीर केली आहे. तर, परंपरागतरित्या सोहळा साजरा केला जाणार असून, त्यात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही.
तुकाराम बीज सोहळ्यासाठीची नियमावली –
- केवळ पन्नास भाविकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी
- पन्नास भाविकांच्या उपस्थितीतच सर्व विधीवत पूजा पार पडणार
- उपस्थित राहणाऱ्या भाविकांचे पोलीस पास बनवून घ्यावे लागणार
- उपस्थित राहणाऱ्या पन्नास भाविकांची कोरोना चाचणी करून घेणं बंधनकारक
- विश्वस्तांनी भाविकांना देहूत न येण्याचं आवाहन करावं
- घरी बसून भाविकांना दर्शन घेता यावं, यासाठी लाईव्हची सुविधा उपलब्ध करावी
- संचारबंदी लागू केली जाणार
महत्वाच्या बातम्या
- ‘मी बारामतीतून लोकसभा लढविणार’, महादेव जानकरांचा इरादा पक्का
- सचिन वाझे, परमबीर सिंग छोटी माणसं, त्यांच्या मागचे सूत्रधार शोधा : फडणवीस
- शिवसेनेच्या सक्रिय नेत्यांबरोबर सचिन वाझेचे व्यावयासिक संबंध
- राज्याची चिंता वाढली; तब्बल २० हजारांहून अधिक रुग्णांची आज नव्याने भर !
- ‘संजय राठोड प्रकरणात ऑडिओ क्लिपशी छेडछाड केली गेली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
