Share

‘संजय राठोड प्रकरणात ऑडिओ क्लिपशी छेडछाड केली गेली’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुण्यातील वानवडी परिसरातील एका इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. पूजा चव्हाण ही मूळची परळीची होती. पूजा चव्हाण या तरुणीचे संबंध संजय राठोड यांच्याशी जोडले गेल्यानंतर या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ या चांगल्याच आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं.

काही फोटो व कथित ऑडिओ रेकॉर्ड्स समोर आले होते. यातील काही किल्प्समध्ये पूजाशी संजय राठोड यांचे संभाषण झाल्याचा आरोप भाजपने केला होता. संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्र घेत त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेऊन रितसर चौकशी करावी अशी मागणी केली होती. वाढत्या तणावानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्या वनमंत्रिपदाचा राजीनामा घेतला आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक आरोप केले आहेत. ‘संजय राठोड प्रकरणात ऑडियो क्लिपशी छेडछाड केली जात आहे. सरकारमधील कुठल्या मंत्र्यांच्या किंवा व्यक्ति च्या सांगण्यावरुन हे होतयं ?? संजय राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी आमची शंका आहे तेव्हा सरकारने कुठलीही हेराफेरी न करता सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावे,’ अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

https://twitter.com/ChitraKWagh/status/1372193173787734021?s=20

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!