🕒 1 min read
अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री आणि अहमदनगरचे माजी खासदार भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. आज (१७ मार्च) पहाटे दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी चाचणी केली असता त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्यानंतर ते उपचारासाठी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात भरती झाले होते.
दिलीप गांधी यांनी ३ वेळा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१९ मध्ये भाजपने या मतदार संघातून सुजय विखे यांना तिकीट दिल्याने दिलीप गांधी पक्षावर नाराज होते. भाजपचा सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री असा दिलीप गांधी यांचा प्रवास कौतुकास्पद होता. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. तर २९ जानेवारी २००३ ला त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर झालेल्या २००४ मधील लोकसभा मिवाद्नुकीत त्यांना तुकाराम गडाख यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला होता.
संघाच्या मुशीत तयार झालेले दिलीप गांधी यांचे २०१९ मध्ये खासदार सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तिकीट कापले होते. त्यामुळे गांधी पक्षावर नाराज देखील होते. संघाचा आणि भाजपचा कट्टर कार्यकर्ता अशी दिलीप गांधी यांची ओळख होती. दिलीप गांधी पक्षावर नाराज असले तरीदेखील भाजप त्यांच्या नसानसांत भिनलेली होती. एका नवख्या पोरामुळे आपलं तिकीट कापले गेले याची खंत त्यांना होतीच पण तरीदेखील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंच्या विजयासाठी दिलीप गांधी यांनी जंग-जंग पछाडले होते.
२०१९ च्या अहमदनगर येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेदरम्यान चालू सभेत दिलीप गांधींना कंठ दाटून आला होता. आता या सभेची आठवण काढून नगर भाजपचे कार्यकर्ते भावूक झाले आहेत. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं अहमदनगर जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी, व्यासपीठावर बोलताना त्यांना थांबण्यास सांगितल्याने ते चांगलेच चिडले होते. नरेंद्र मोदी सभेस्थळी पोहोचण्यापुर्वी काही क्षण अगोदर ही घटना घडली होती.
दिलीप गांधी यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी भाषण थांबविण्यास सांगितले. त्यामुळे ते भडकले. गांधी म्हणाले, दोन मिनिटात काय?, मी 10 मिनिटे बोलतो. नाहीतर मला बोलायचं नाही, असे म्हणत ते सभेतून निघून जात होते. त्यावेळी डॉ. सुजय विखे यांनी सर तुम्ही बोला, म्हणत गांधींना भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर आपलं आयुष्य एका पक्षासाठी देणाऱ्या दिलीप गांधींना भाषणात कंठ दाटून आला होता. त्यांचे पाणावलेले डोळे त्यावेळी कॅमेरात कैद झाले होते. आज हा भाजपचा सच्चा कार्यकर्ता आपल्यात नसल्याचा कार्यकर्त्यांना विश्वास बसत नाही. अन् दिलीप गांधींच्या त्या पाणावलेल्या डोळ्यांची आठवण काढून कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बोंबला … ३ लेकरांच्या आईने १४ वर्षाच्या प्रियकराला पळवून नेले; घटना ऐकून पोलीस देखील चक्रावले
- ‘माँ, माटी और मानुष’ ! बांगलमध्ये कोणीही सुरक्षित नाहीय’
- ‘My Men in frame’ लहान भाऊ, करीना आणि सैफसाठी तैमुरने बनवला खास पदार्थ !
- फुलराणीचे ३१व्या वर्षात पदार्पण…
- भोजपुरी अभिनेता निघाला दुचाकी चोर; दिल्ली पोलिसांनी केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
