Share

बँकेचे विद्यमान अध्यक्ष पंडित चोखट यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा 

Published On: 

🕒 1 min read

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष पंडित चोखट यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी गंगाधर कदम यांनी मानवत तालुक्यातून विविध कार्यकारी सेवा सहकारी मतदारसंघातून दाखल केलेला आपला उमेदवारी अर्ज आज मंगळवारी मागे घेतला.

त्यामुळे आता पंडीत चोखट यांच्यासह त्यांचा मुलगा आकाश चोखट असे दोनच अर्ज शिल्लक आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना दिली. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर मानवत सर्वसाधारण गटातून बिनविरोध निवडीसाठी पंडित चोखट यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबद्दल पाथरीचे काँग्रेसचे सुरेश वरपूडकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेच्या गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

तर भाजप मात्र एकला चलो रे ची भूमिका पार पाडताना दिसत आहे. या निवडीमुळे संचालक मंडळाच्या निवडीबाबत देखील चुरस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वेळी हिंगोली जिल्ह्यातील सर्व पक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी अध्यक्षांच्या निवडीबद्दल स्वागत करुन आपापल्या मतदार संघामध्ये व्यवस्थित लक्ष ठेवून राहण्याची गरज व्यक्त केली. आमदार सुरेश वरपूडकर यांच्या गटाचा अध्यक्ष झाल्याने पुन्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व होणार हे चित्र मात्र आता स्पष्ठ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!