Share

वरळी : कोरोनाचे नियम फक्त गरिबांसाठी ? पबमधील व्हिडीओ शेअर करत मनसेच्या नेत्याने केला भांडाफोड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. राज्यात पुन्हा कोरोना डोकं वर काढत असून अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पुन्हा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात पुन्हा टाळेबंदी करण्याचा इशारा देत आहेत. सोबतच ते कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचं आवाहन देखील करत आहे.मात्र अनेक ठिकाणी नियमांना हरताळ फासला जात असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं असाच एक प्रकार समोर आणला आहे.

राज्यात इतर ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले असते तर समजू शकण्याची बाब होती मात्र मनसे नेते संतोष धुरी यांनी एक लाईव्ह व्हिडीओ शेअर करत राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा क्षेत्रात कसे नियम पायदळी तुडवले जात आहेत याची पोलखोल केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात बिनधास्तपणे मध्यरात्रीपर्यंत पब सुरू आहेत आणि तिकडे कोणत्याही प्रकारचे कोरोनाविषयक ठरवुन दिलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे. वरळीच्या कमला मिल कंपाऊंड परिसरात असलेल्या पब मध्ये जाऊन मनसेच्या संतोष धुरी यांनी स्वतः लाईव्ह करून भांडाफोड केला.

‘मुख्यमंत्री ठाकरे पत्रकार परिषदेत कोरोना संपला नसल्याचं सांगतात. पण वरळीतल्या कमला मिलमध्ये १२ वाजून गेल्यानंतरही पब सुरू आहे. इतर ठिकाणी ११ वाजता पब बंद होतात. मग वरळीतले पब रात्रीचे १२-१ पर्यंत कसे काय सुरू असतात. यांना कोण परवानगी देतं?’, असा सवाल धुरींनी उपस्थित केला.

‘आदित्य ठाकरेंच्या मतदासंघात सर्व नियम धाब्यावर बसवले जातात आणि मुख्यमंत्री सर्वसामान्यांना कोरोना गेलेला नसल्याचं सांगतात. सामान्य लोकांसाठी कोरोना आहे. पण श्रीमंतांसाठी कोरोना नाही. युवराज आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ही परिस्थिती आहे,’ असं धुरी म्हणाले.

या पब मध्ये अनेक तरुण-तरुणी मास्क न लावता गर्दी नारून झिंगताना दिसत आहेत.पबमध्ये कोणतंही सोशल डिस्टन्सिंग नव्हतं. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. मध्यरात्री १२ वाजून गेल्यावर देखील या ठिकाणी पब सुरु असल्याचे दिसून येत आहे.

सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यास सरकार सांगत असताना अश्या पद्धतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महाभागांवर सरकार का कारवाई करत नाही असा देखील सवाल उपस्थित होत आहे. या पब चालकासोबतच त्याच्या मागे कोणत्या राजकीय शक्ती उभ्या आहेत याचा देखील शोध घेतला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!