🕒 1 min read
मुंबई : पूजा चव्हाणच्या मृत्यूशी थेट संबंध असल्याने संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची डोके दुखी वाढणार हे स्पष्ट होतं.
संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपने दिला होता. वाढत्या दबावामुळे अखेर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारद्वारे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी, उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले.
भाजपने महाविकास आघाडी सरकारवर आरोप केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपलाच सवाल केला आहे. माजी केंद्रीय मंत्री निहाल चंद यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा का घेतला नाही? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राठोडांनी चौकशीआधीच दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्विकारला.घटनेची सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई होईलच. माजी केंद्रीय मंत्री निहाल चंदवरील बलात्काराच्या आरोपानंतर मोदींनी राजीनामा का घेतला नाही? याचे उत्तर कथुआ,उन्नाव,हाथरस बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपाने द्यावे
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 28, 2021
‘संजय राठोडांनी चौकशीआधीच दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्विकारला. घटनेची सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई होईलच. माजी केंद्रीय मंत्री निहाल चंदवरील बलात्काराच्या आरोपानंतर मोदींनी राजीनामा का घेतला नाही? याचे उत्तर कथुआ,उन्नाव,हाथरस बलात्काऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपाने द्यावे,’ अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘एका मंत्र्याच्या राजीनाम्याची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता…’
- इंधन दरवाढ…हा तर केंद्र सरकारचा सामान्यांच्या खिश्यावर दिवसाढवळ्या डल्ला
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- मला फडणवीसांची कीव करावीशी वाटते; मुख्यमंत्री ठाकरे कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
