मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप होत असून कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज देखील आता समोर आले आहेत. यामुळे संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती.
येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची डोके दुखी वाढणार हे स्पष्ट होतं. यामुळेच, अधिवेशना आधी संजय राठोड यांच्या राजीनामा घ्यावा यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील दबाव होता. संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी बोलवून राजीनामा देण्यासाठी सांगितले होते. यानुसार संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.
यावेळी शिवसेनेचे अनेक नेते देखील वर्षा या निवासस्थानी उपस्थित होते. मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब आदी नेते वर्षा या निवासस्थानी उपस्थित होते. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधून आपली बाजू मांडली आहे. ‘हो, मी राजीनामा दिला आहे. गेले ३० वर्षे असलेल माझं राजकीय, सामाजिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपने माध्यमांच्या द्वारे अत्यंत घाणेरडं राजकारण करून माझ्यावर व माझ्या समाजावर बदनामीकारक आरोप केले. पूजा चव्हाण च्या मृत्यू प्रकरणाचा तपास हा निःपक्षपणे व्हावा, यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे.’ असं भाष्य संजय राठोड यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राठोडांवरील आरोपांवर इतके दिवस ठाकरेंनी शांत बसणं म्हणजे केवळ सत्तेची लालसा – भाजप
- बहन मायावती आरपीआय मध्ये आल्यास त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू – रामदास आठवले
- ‘जो पर्यंत राहुल गांधी काँग्रेस मध्ये आहेत तो पर्यंत काँग्रेसचे काही भले होणार नाही’
- मोठी बातमी : अखेर संजय राठोड यांनी राजीनामा दिला ; मुख्यमंत्री मंजूर करणार का ?
- उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या करिष्म्याला आरपीआयची साथ; आठवलेंनी केली मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
